जळगाव मिरर | २३ जून २०२४
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदार संघाचा पराभव महाविकास आघाडीच्या चांगल्या ज्वारी लागल्याचे दिसून येत आहे . विशिष्ट चाळीसगाव हे सत्ता केंद्र बनल्याने व आमदार मंगेश चव्हाण हेच या निवडणुकीतील हिरो ठरल्याने, महाविकास आघाडीच्या नेत्यांची पायाखालची वाळू सरकली आहे व विधानसभेचे त्यांना पराभव दिसू लागल्याने एका स्थानिक पुढाऱ्याने आमदारांना थेट गोळी घालण्याची भाषा केली आहे. या प्रकारामुळे महायुतीचे कार्यकर्ते प्रचंड संतापले असून त्यांनी गुंडागिरीची भाषा करणाऱ्या नेत्याला अटक करण्याची मागणी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे कळते.
महाविकास आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले, मात्र हे धरणे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी होते की फक्त आमदार मंगेश चव्हाण यांना विरोध म्हणून होते याची चर्चा सुरू असतानाच या आंदोलनातील एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.
लोकसभा निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे सर्व विरोधक एक एकवटले होते व त्यांनी सर्व क्लुप्त्या ,युक्त्या वापरून देखील त्यांना तालुक्यातून मताधिक्य देता आले नाही. व विधानसभेत आजच त्यांना पराभव दिसत असल्याने आमदार मंगेश चव्हाण यांना विचलित करण्यासाठी व तालुक्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालवण्याचा आरोप आता महायुतीच्या नेत्यांकडून होत आहे.
या धरणे आंदोलनाच्या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात टाकळी प्रचा गावाचे माजी सरपंच व महाविकास आघाडीचे नेते किसन जोर्वेकर याने आपल्या भाषणात आमदार मंगेश चव्हाण यांच्याविषयी बोलताना “माझ्या नादी लागशील तर पिस्तूलाने गोळी घालून मारून टाकेल रस्त्यावर” अशी जाहीर धमकी दिली. विशेष म्हणजे ही धमकी ज्याठिकाणी दिली त्या ठिकाणी समोरच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन आहे. तसेच त्यावेळी मंचावर तालुक्यातील महाविकास आघाडीचे माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख व नेते पदाधिकारी देखील उपस्थित होते. मात्र यातील कुणीही या धमकीला विरोध तर सोडाच उलट टाळ्या वाजवून, हसून दाद दिलेली दिसली.
सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असणाऱ्या चाळीसगाव मध्ये एका राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर विद्यमान आमदाराला गोळी घालण्याची जाहीर धमकी देण्याचा प्रकार प्रथमच घडला असून याच्या संतप्त प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत.
राज्यातील टॉप टेन मधील असलेले आमदार मंगेश चव्हाण यांची राज्यात आपल्या धडाकेबाज कामांमुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसाठी १२ दिवस जेल भोगणारे, वारकरी, युवक, आशा, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, सर्व समाजघटकांना न्याय मिळवून देत प्रसंगी पदरमोड करून त्यांची कामे करणारे आमदार मंगेश चव्हाण यांना जीवे मारण्याच्या देण्यात आलेल्या या धमकीचा जाहीर निषेध. हे चाळीसगाव आहे, इथे अश्या विकृत राजकारणाला कधीच थारा मिळाला आणि मिळणारही नाही. आणि अश्या समाजविघातक प्रवृत्तीला पुढे करून जर कुणी राजकारण करणार असेल तर त्याला निवडणूकीत जागा दाखवण्याची ताकद देखील चाळीसगावच्या सुज्ञ जनतेमध्ये आहे