जळगाव मिरर | ९ ऑक्टोबर २०२४
चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यात महापुरुषांचे विचार व त्यांचे कार्य याचा जोगवा करण्याचा चंग बांधला आहे. त्यातूनच तालुक्यात महापुरुषांचे स्मारके, त्यांच्या नावाने, चौक, रस्ते , सभामंडप, सभागृहे उभी राहिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सभागृह, अहिल्यादेवी सभागृह, संत सावता सभागृह, वीर एकलव्य भवन, संत सेवालाल भवन या महापुरुषांना बरोबरच तालुक्यातील शहीद जवानांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
https://youtu.be/4ZHprhSWDeM
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देखील तालुक्यातील 14 ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन उभारले जाणार आहे. सदर सामाजिक भवन व इतर कामांसाठी शासनाने नुकत्याच रुपये 5 कोटी रुपयांचा निधी मंजुरी दिली आहे. त्यामुळे सामाजिक भवनातून आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता,न्याय, बंधुता या विचारांच्या शिकवणीचा जोगवा या निमित्ताने होणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच चाळीसगाव येथे महाराणा प्रताप यांच्या नावाने उभारलेल्या भव्य चौकाचे लोकार्पण करण्यात आले, त्यानंतर महात्मा ज्तोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी 2 कोटी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन आदी कामांसाठी ५ कोटी असा भरघोस निधी उपलब्ध केला आहे.
“भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सामाजिक न्याय भवन उभारण्यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत होतो, लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या सामाजिक विकास निधीतून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. बाबासाहेबांचे विचार कायम तेवत ठेवण्यासाठी हे सामाजिक भवन प्रेरणास्थान बनतील, भरघोस असा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे आभार मानतो” :- आमदार मंगेश दादा चव्हाण
https://youtu.be/4ZHprhSWDeM
मंजूर झालेल्या कामांची नावे व झालेले निधी खालील प्रमाणे.
1) चाळीसगाव शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन निर्माण करणे 1 कोटी 20 लक्ष
2) चाळीसगाव शहरात चौक सुशोभिकरण करणे 50 लक्ष
3) चिंचखेडे येथे संविधान सभागृह भवन बांधकाम करणे 10 लक्ष
4) हातले येथे दलित वस्तीत सभामंडप बांधकाम करणे 20 लक्ष
5) लोंजे येथे दलित वस्ती मध्ये संविधान भवन इमारत बांधकाम करणे 20 लक्ष
6) दस्केबर्डी येथे नवीन बौद्ध समाज मंदिर बांधकाम करणे 15 लक्ष
7) रामनगर दलित वस्ती रस्ता कॉक्रींटीकरण करणे 15 लक्ष
8) सायगाव येथे दलित वस्ती चौक सुशोभीकरण करणे 10 लक्ष
9) शिरसगाव येथे दलित वस्ती रस्ता सुधारणा करणे 10 लक्ष
10) खडकी बु, येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन बांधकाम करणे 50 लक्ष
11) अलवाडी येथे बुद्ध विहार बांधकाम करणे 30 लक्ष
12) पिंप्री बु. प्र.दे. येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम करणे 15 लक्ष
13) वडगाव लांबे येथे महर्षी वाल्मिकी भवन बांधकाम करणे 10 लक्ष
14) वडगाव लांबे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन बांधकाम करणे 10 लक्ष
15) टाकळी प्र.चा. येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकाम करणे 30 लक्ष
16) कुंझर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकाम करणे 20 लक्ष
17) रांजणगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकाम करणे 20 लक्ष
18) देवळी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या लगतच्या नदीस संरक्षक भिंत बांधकाम व अनुषंगिक कामे करणे 20 लक्ष
19) पिंपळगाव येथे रस्ता कॉक्रींटीकरण करणे 15 लक्ष
20) पिंपळवाड निकुंभ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन बांधकाम करणे 20 लक्ष
एकूण 500 लक्ष