जळगाव मिरर | ९ नोव्हेबर २०२३
पारोळा तालुक्यातील हिवरखेडे बु!!. येथील जि़.प.प्राथमिक शाळेत शहरातील पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गोरगरीब मुलांसोबत माणूसकीची दिवाळी साजरी केली आहे.
पारोळा शहरातील पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल येथील प्राचार्य गायत्री जैन यांच्या संकल्पनेतून हिवरखेडे बु!!. शाळेतील गोरगरीब मुलांसोबत माणूसकीची दिवाळी साजरी केली. पोद्दार इंग्लिश मेडीयम स्कूल पारोळा येथील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पाॅकेट मनीच्या साठवलेल्या पैशातून आमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी एक ड्रेस, फरसाण, मिठाई व फटाके भेट म्हणून दिले.आमच्या शाळेतील विद्यार्थ्यासाठी हा क्षण खरोखरच खूपच अविस्मरणीय होता. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोद्दार इंग्लिश मेडीयम स्कूल पारोळा येथील चेअरमन श्रीमती रितलता नवले, सचिव आशुतोष सोलंकी, प्रिन्सिपल गायत्री गुजराती व मनोज शंखपाल, रोहित देवरे , शेबिन थॉमस, ममता महाजन, मोनाली मोरानकर, सौ.जोशना महाले व जि.प.प्राथ शाळा हिवरखेडे बु!!. शाळेचे मुख्याध्यापक दगडू पाटील व उपशिक्षक ईश्वर धोबी तसेच समाधान धनगर,योगेश पाटील ,विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.