
जळगाव मिरर । 18 डिसेंबर 2022 ।
तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस दि.16 रोजीच्या मध्यरात्री अनोळखीने काही तरी फूस लावून पळवून नेल्याची घटना सकाळी उघडकीस आल्याने अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिस स्थानक गाठत अनोळखी इमसाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि अमोल मोरे हे करीत आहेत.




















