
जळगाव मिरर । ३० नोव्हेबर २०२२
भुसावळ तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीस घराजवळून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने मुलीच्या घराजवळून काही तरी फूस लावून पळवून नेल्याची घटना दि २८ रोजी दुपारी घडली या प्रकरणी मुलीच्या पालकांनी भुसावळ तालुका पोलिसात धाव घेत अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि अमोल पवार हे करीत आहेत.




















