जळगाव मिरर | २९ जून २०२४
तालुक्यातील आमोदे गावातील एका भागात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेतल गावात राहणाऱ्या एकाने तिच्यासोबत अश्चिल चाळे करत विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना बुधवारी २६ जून रोजी सकाळी १० वाजता समोर आला आहे. या प्रकरणी गुरुवार २७ जून रोजी रात्री १ वाजता जळगाव तालुका पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आमोदे गावातील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. हे. बुधवार २६ जून रोजी सकाळी १० वाजता पीडित मुलगी ही घरी एकटी असताना याचा फायदा घेऊन गावात राहणारा विशाल भिल याने पीडित मुलीच्या घरात घुसून तिच्यासोबत अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केला आहे. ही घटना पीडित मुलीने तिच्या नातेवाईकांना सांगितले. त्यामुळे तिचे नातेवाईकांनी जळगाव तालुका पोलीस ठाणे येथे धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरुवार २७ जून रोजी मध्यरात्री १ वाजता संशयित आरोपी विशाल भील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे हे करीत आहे.




















