अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर येथे पत्रकार व नागरिकांसाठी मल्टिपर्पज कम्युनिटी हॉल उभारण्यात येणार आहे. सोमवारी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते या हॉलचे भूमिपूजन करण्यात आले. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यात पहिला मल्टिपर्पज कम्युनिटी हॉल आकारास येणार आहे.
अमळनेर सारख्या तालुका पातळीवर पत्रकारांना योगा हॉल, वार्तांकन करण्यासाठी हक्काची जागा, पत्रकार परिषदेला हक्काची जागा उपलब्ध व्हावी. यासाठी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेने नगरपरिषदेकडे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. स्थानिक रहिवाशांच्या संमतीने शहराच्या मध्यवर्ती भागात खुल्या भूखंडात नगरपालिकेने मंजुरी दिली. त्यांनतर शासनाच्या निधीतून सुमारे आठ हजार स्केवरफुट जागेला वॉल कंपाउंड करण्यात आले. त्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सहकार्याने शासनाकडून ‘मल्टिपर्पज कम्युनिटी हॉल’ साठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. २७ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तालुका पातळीवर प्रथमच पत्रकारांसाठी सुविधा करण्यात आली आहे. या कार्यक्रमास माजी आमदार साहेबराव पाटील , नगरपालिकेचे अभियंता अमोल भामरे , मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, मुंदडा फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा , सुभाष अग्रवाल, राजेंद्र देशमुख , शेखा हाजी , अविनाश संदानशीव उपस्थित होते.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपुत , उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर ,सचिव चंद्रकांत पाटील, संजय पाटील ,किरण पाटील , महेंद्र रामोसे ,आर जे पाटील , अमोल पाटील , मिलिंद पाटील , गणेश पाटील , युवराज पाटील , मुन्ना शेख , आबीद शेख ,नूर खान , समाधान मैराळे , सुरेश कांबळे , विनोद पाटील , विजय पाटील , डिगंबर महाले , उमेश काटे ,जयेश काटे ,अनिल पाटील ,काशिनाथ चौधरी,सत्तार खान, रवींद्र मोरे ,जयवंत वानखेडे ,उमेश धनराळे , हजर होते. यासाठी माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी , हभप प्रसाद महाराज, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, अभियंता दिगंबर वाघ यांचेही यासाठी सहकार्य लाभले.