जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२५
आजोबांच्या नावावर असलेला प्लॉटवर वारस लावण्यासह हक्कसोड आणि कर्जाच्या बोजाची नोंद करण्यासाठी, साहेबांकडून काम करुन देण्याच्या मोबदल्यात नगर भूमापन अधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या अविनाश सदाशिव सनंसे (वय ४९) या खासगी इसमाला एक हजारांची लाच घेतांना पकडले. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या जळगाव शहरातील रहिवासी असलेले तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या प्लॉटवर वारस नोंदणी, हक्कसोड प्रक्रिया आणि कर्जाच्या नोंदीसाठी संबंधित नगर भू मापन अधिकारी कार्यालयातील साहेबांकडून काम करून देण्याच्या मोबदल्यात त्याच कार्यालयात काम करणारा खासगी व्यक्ती अविनाश सदाशिव सनंसे (वय ४९) याने लाचेची मागणी केली होती. सुरुवातीला प्रत्येक नोंदणीसाठी ५ हजार रुपये प्रमाणे एकूण १५ हजार रुपये आणि काम सुरू करण्यासाठी १,५०० रुपये मागितले. मात्र तडजोडीनंतर एक हजार रुपयांची रक्कम ठरली.
तक्रारदाराने याबाबत तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने आरोपीला १ हजार रुपये देताच पथकाने अविनाश सनंसे याला रंगेहात पकडले. या प्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोकॉ राकेश दुसाणे, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.