जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२५
भुसावळ येथून जळगाव शहरात येत असलेल्या धावत्या कारमधून धूर निघून कारला आग लागल्याची घटना तरसोद फाट्याजवळील हॉटेल राधाकृष्णजवळ गुरुवारी रात्री ९.४५ वाजता घडली. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी फायर एक्सर्टिग्विशने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
भुसावळकडून जळगाव शहराकडे जात असलेल्या कारमध्ये एक दांपत्य व त्यांची मुलगी प्रवास करीत होते. कार्यधून अचानक धूर निघत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तरसोद फाटा येथील हॉटेल राधाकृष्ण जवळील कार थांबवली. कार थांबताच कारने पेट घेऊन रौद्र रूप धारण केले. या वेळी जवळच असलेल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दोन फायर एक्सर्टिग्विशरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले.




















