जळगाव मिरर | २३ डिसेंबर २०२४
चोपडा तालुक्यातील गलंगीजवळ आज रात्री खड्डे चुकवण्याच्या नादात ट्रक रस्त्यावरच उलटला होता. तर या ट्रकला पहाटे भरधाव कारने जबर धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून यातील काही प्रवाशांना किरकोळ इजा झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, बेंगलोर ते राजस्थानमधील जयपूर येथे अद्रक भरून जाणारा ट्रक (आरजे २०, बी ३२३९) हा गलंगी गावाजवळून आज रात्री जात होता. खड्डा टाळण्याचा ट्रक चालकाने प्रयत्न केला असता हा ट्रक रस्त्यावरच उलटला. परंतु, सुदैवाने यात जीवितहानी टळली. दरम्यान, आजच पहाटे ४ ते ५ वाजेदरम्यान होंडा कंपनीची चारचाकी (आरजे- २०, सीई- १८४०) ही देखील गलंगी गावाजवळून जात होती. तर खड्डे चुकवत असताना ही चारचाकी रस्त्यावर उलटलेल्या ट्रकवर आदळली. यात चारचाकीच्या पुढच्या भागाचा अक्षरशा चुराडा झाला आहे. परंतु, त्यांचे नशीब चांगले असल्याने जिवीतहानी झाली नाही.
परंतु, कारमधील काही महिला व बालकांना किरकोळ दुखापत झाली आहे. परंतु, या अपघातात ट्रक व होंडा कंपनीच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्गावरील गलंगी ते चोपडयापर्यंत सर्वत्र खड्डे पडले आहेत. त्यामुळे गलंगी ते चोपडा शहरापर्यंत जाण्यासाठी वाहनधारकांना तारेवरची कसरतच करून तसेच जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. परंतु, या गंभीर समस्येकडे बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. तर या गंभीर समस्येकडे कुणी लक्ष दाईल का? असा प्रश्न तालुक्यातील सामान्य जनतेसह वाहनधारक यानिमित्त उपस्थित करत आहेत.