
जळगाव मिरर | ११ एप्रिल २०२४
शहरातील खोटेनगरजवळ रविवार दि. १७ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चारचाकी कारला भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल येथील माहेर असलेल्या प्रतीक्षा सचिन पाटील (वय २५, रा. आयोध्यानगर) यांच्या आईची शस्रक्रिया झाल्याने त्यांच्या भेटीसाठी प्रतीक्षा यांच्यासह त्यांचे पती सचिन पाटील (वय ३५), मुलगा देवांश सचिन पाटील (वय वय अडीच वर्षे) तसेच प्रतीक्षा यांची बहीण नंदीनी पाटील (वय १९), विनोद सोपान पाटील (वय ४५) हे कारने रविवारी दुपारी एरंडोल येथे जाण्यासाठी निघाले. त्यांची कार खोटे नगरच्या पुढे गेल्यानंतर समोरून येणाऱ्या चारचारी वाहनाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेकच्या प्रयनात कारला समोरून धडक दिली. त्यात कारमधील पाचही जण जखमी झाले. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. जखमींना तात्काळ उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.




















