मेष : आज प्रलंबित असणारे सरकारी किंवा वैयक्तिक काम पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सुख आणि शांती हीच तुमची प्राथमिकता असेल. मुलांच्या अभ्यासाबाबत किंवा करिअरबाबत चिंता वाढेल. अचानक खर्च वाढल्याने तुमच्या बजेटवर परिणाम होवू शकतो. सामाजिक कार्यात काम करताना नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. व्यवसायात यश लाभेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
वृषभ : ग्रहांचे संक्रमण सकारात्मक राहील. रखडलेल्या कामांना गती मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. प्रतिष्ठित लोकांच्या भेटीमुळे लाभ आणि सन्मान मिळेल. तुमची कार्यक्षमताही सुधारेल. स्वार्थी मित्रांपासून दूर राहा. त्यांचा चुकीचा सल्ला तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकतो, अनोळखी व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन केल्यानंतरच त्यांच्याशी नाते निर्माण करा. कुटुंबाच्या सहकार्याने कामात लक्ष द्या. अतिकामामुळे डोकेदुखीचा त्रास जाणवेल.
मिथुन : पाहुण्यांच्या आगमनामुळे आज कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील. आत्मविश्वासाने कार्यरत राहिल्याने यश मिळेल. प्रतिष्ठित लोकांशी संपर्क मजबूत करा. उत्पन्नाचे साधनाबरोबरच खर्चही वाढेल. आर्थिक स्थिती बिघडणार नाही, याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. रक्ताशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवू शकते.
कर्क : आज तुम्ही प्रत्येक काम पूर्ण मेहनतीने पूर्ण करण्याचे नियोजन कराल. तुमच्या समर्पित वृत्तीने केलेल्या कर्माचे तुम्हाला योग्य फळ मिळेल. मित्राच्या पाठिंब्याने धैर्य वाढेल. राजकीय किंवा न्यायालयाशी संबंधित कोणतेही प्रकरण सुरू असेल तर सावध राहा. कार्यक्षेत्रात तुमची उपस्थिती आवश्यक असेल. कौटुंबिक सहकार्य आणि आनंदाचे वातावरण राहील.
सिंह : आज तुम्हाला एखाद्या दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. आर्थिक व्यवहार संतुलित ठेवण्यास सक्षम असाल. विपरीत परिस्थितीत घाबरून जाण्याऐवजी त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बळावर तुम्ही परिस्थिती सुधारण्यास सक्षम असाल. एखाद्यासोबत भागीदारीबाबत योजना असू शकते. वैवाहिक जीवन आणि व्यावसायिक जीवनात चांगले सामंजस्य राखले जाईल. आरोग्य चांगले राहील.
कन्या : आज जवळच्या नातेवाईकाचे अचानक आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण होईल, असे श्रीगणेश सांगतात. सकारात्मक गोष्टीही घडतील. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडथळे दूर झाल्यामुळे दिलासा मिळेल. चुकीच्या वादापासून दूर राहा. वारसा हक्काच्या वादावरून तणाव निर्माण होऊ शकतो. तुमचा संशयी स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करा. व्यवसायातील घडामोडींवर पूर्ण नियंत्रण असेल. कौटुंबिक छोट्या-छोट्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा सध्याच्या नकारात्मक वातावरणामुळे बेफिकीर राहणे योग्य नाही.
तूळ : समाजाशी संबंधित कार्यात आपले योगदान द्या. जनसंपर्काच्या व्याप्तीबरोबरच तुमची लोकप्रियताही वाढेल. काही राजकीय लोकांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक व्यवहारात अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणतेही काम टाळण्याचा प्रयत्न करू नका, काही नवीन योजना आणि व्यवसायात यश मिळेल. प्रेमसंबंधांना कौटुंबिक सौहार्द मिळू शकेल. वातावरणातील बदलामुळे आळशीपणा जाणवेल.
वृश्चिक : कुटुंबात आज काही धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्याचे आयोजन कराल. यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येईल, नकारात्मक गोष्टींचा विचार करु नका, अन्यथा तुमचे मनोबल कमी होऊ शकते. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. उत्पन्न वाढीबरोबरच खर्चाचीही स्थिती असेल. एकमेकांशी सुसंवाद कमी झाल्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. शिळे अन्न खाणे टाळा.
धनु : आजच्या लाभदायक ग्रहस्थितीचा पुरेपूर लाभ घ्या. मुलांशी संबंधित काही महत्त्वाचे काम होऊ शकतात. घरातील वातावरण आनंदी राहील. तुमचा विवेक आणि आदर्शवाद तुम्हाला घरात आणि समाजात आदर देईल. ते व्यावहारिक असणे देखील आवश्यक आहे. खूप आदर्शवादी असणे हानिकारक ठरू शकते. यामुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता. काही काळापासून मंद गतीने सुरू असलेली व्यावसायिक कामे आज वेग घेतील. पती-पत्नीमध्ये सुसंवाद राहील.
मकर : आज ग्रहांची स्थिती खूप समाधानकारक राहील. सर्व कामे शांततेने पूर्ण होतील. विरोधक नमते घेतील. कर्ज घेणे टाळा. तुम्ही कोणाला वचन दिले असेल तर ते पाळावे. अन्यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. व्यावसायिक कामे थोडी मंद असू शकतात. पती-पत्नीचे भावनिक नाते घनिष्ट होईल. आरोग्य चांगले रहिल.
कुंभ आज काही अडचणी असूनही, तुम्ही तुमच्या सकारात्मक दृष्टीकोन आणि संतुलित विचाराने कार्ये पूर्ण कराल. हळूहळू परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. अंतर्गत कौटुंबिक गोष्टींबद्दल जवळच्या नातेवाईकांमध्ये तणाव असू शकतो. सध्या कोणतीही नवीन गुंतवणूक टाळा. पैशांशी संबंधित नकारात्मक परिस्थिती दिसून येत आहे. व्यावसायिक कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ झाल्यास कुटुंबातील लोकांचा सल्ला घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्य चांगले राहू शकते.
मीन : आज प्रलंबित आर्थिक व्यवहार मार्गी लागल्याने दिलासा मिळेल. धार्मिक स्थळी गेल्याने तुम्हाला मानसिक शांतीही लाभेल. बेकायदेशीर कृत्यात सहभागी असणार्यांपासून लांब राहा. अन्यथा अपमानाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सकारात्मक कृतींमध्ये सहभागी व्हा. व्यवसायाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बदल करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. प्रकृती चांगली राहिल.