• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सूर्या फाउंडेशनतर्फे आयोजन, विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी मार्गदर्शन, संधी आणि भविष्याचा वेध

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 9, 2025
in जळगाव
0
सूर्या फाउंडेशनतर्फे आयोजन, विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी मार्गदर्शन, संधी आणि भविष्याचा वेध
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ मार्च २०२५

खान्देशातील विद्यार्थी, युवक आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी निर्माण करणारा “खान्देश करिअर महोत्सव” दि.२९, ३० व ३१ मार्च रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सुर्या फाऊंडेशनतर्फे आयोजित महोत्सवाला पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे विशेष सौजन्य लाभणार आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत एम. जे. कॉलेज, जळगाव येथील ए. टी. झांबरे पटांगणावर हा महोत्सव भव्य स्वरूपात पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार, उद्योग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या विविध संधींबद्दल मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी आणि उद्योगजगतातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. पद्मालय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला प्रेस सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.अर्चना सूर्यवंशी, धनराज कासट, प्रशांत सूर्यवंशी स्वरराजच्या इव्हेंट्सच्या संचालिका मोहिनी चौधरी, मुकूंद गोसावी, पवन जैन, हर्षाली पाटील आदी उपस्थित होते.

महोत्सवाचे उद्घाटन दि.२९ मार्च रोजी सकाळी १० वाजता पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जळगाव ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, या कार्यक्रमाला केद्रिय राज्यमंत्री खा.रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री ना.संजय सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार व प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अभिनेत्री अलका कुबल येणार, महिलांसाठी ब्रायडल शो
दि.२९ मार्च रोजी महिला सशक्तीकरण व करिअरच्या संधींबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल विशेष उपस्थित राहणार आहेत. यादिवशी सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी खास ब्रायडल शो आयोजित करण्यात आला आहे. त्यात ५० पेक्षा जास्त संस्था, ब्युटी पार्लरने सहभाग नोंदवला आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व व्याख्यान
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दि.३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच, इतर मान्यवर तज्ज्ञ विविध परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण टिप्स व मार्गदर्शन देणार आहेत.

सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण व समारोप
महोत्सवाचा समारोप दि.३१ रोजी सायंकाळी ७ वाजता शालेय शिक्षण मंत्री ना.दादा भुसे अध्यक्षतेखाली होणार आहे. यादिवशी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार असून शालेय संस्थाना पुरस्कार व आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी, आयोजकांचे आवाहन
विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा लाभ घेऊन करिअरच्या योग्य दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रत्येक दिवशी आकर्षक बक्षिसे आणि कार्यशाळा असणार आहेत. एम. जे. कॉलेज, जळगाव येथील ए. टी. झांबरे पटांगणावर हा महोत्सव सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत असणार आहे. महोत्सवाचे नियोजन स्वरराज इव्हेंट्स करीत असून अधिक माहितीसाठी दु.क्रमांक १०, तळमजला, रामभाऊ जोशी मार्केट, गोलाणी मार्केट समोर, जळगाव याठिकाणी किंवा 8668416383, 993278904, 9175675651 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये :
• शालेय (KG to PG) विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन
• भारतातील २०० हून अधिक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, शाळा, क्लासेसचा सहभाग
• UPSC, MPSC, बँकिंग, रेल्वे, SSC आदी स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन
• राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित मान्यवरांची व्याख्याने व मुलाखती
• १०वी, १२वी, शिष्यवृत्ती, उच्चशिक्षण व नोकरीच्या संधींची माहिती
• प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम

Tags: Khandesh mahotasavsurya foundation

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group