जळगाव मिरर / १७ मार्च २०२३ ।
राज्यातील काही परिसरात हवामानाच्या बदलामुळे सध्या उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभवत येत आहे. सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. विदर्भात काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर पाऊस आणि गारपीटचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतं आहे. अशातच सोशल मीडियावर ढगफुटीचा एक व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
हा व्हिडीओ पाहून जणू आकाशातून धबधबा कोसळतोय असं वाटतंय. हा निसर्गाचा अद्भूत नजारा सोशल मीडियावर प्रत्येकाच्या नजरा खिळवून ठेवत आहे. या निसर्गातील चमत्काराचा आनंद इथे आलेले प्रत्येक पर्यटक घेताना दिसतं होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील anaclaudiamqueirozandzonarural_go या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ यूजर्स वारंवार पाहत आहेत. निसर्ग कायम काही तर चमत्कार दाखवत असतो.