
जळगाव मिरर / १९ फेब्रुवारी २०२३ ।
जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अनोळखी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल येथे आरोग्यसेविका म्हणून कार्यरत असलेल्या सुनिता अमोल सपकाळ (वय-३५) रा.जळगाव या शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्या त्यांची दुचाकी (एमएच १९ ईबी १४५४) ने आकाशवाणी चौकातील लाली पान सेंटर येथून जात असतांना त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक एमएच १९ डीव्ही ८५६६ ने जोरदार धडक दिली. त्या धडकेत महिला गंभीर जखमी झाल्या. या घटनेनंतर महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात कार चालकाविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत पाटील हे करीत आहे.




















