जळगाव मिरर | ३१ मे २०२३
जळगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून एका महिलेला अश्लिल शिवीगाळ करीत सुरीने वार करीत जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंगळवार ३० मे रोजी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्या नगर परिसरातील रहिवासी सरला अनिल चौधरी (वय-४२) या दि. २८ मे रविवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास महिला काही कामाच्या निमित्ताने जळगाव स्थानकाजवळील डॉ.आंबेडकर यांचा पुतळ्याजवळ आल्या होत्या. त्यावेळी गाडी पार्किंगला लावण्याच्या कारणावरून विकास अभिमान पवार (वय-३५) रा. तेली चौक, जळगाव या तरुणाने महिलेशी वाद घातला. त्यानंतर त्याने हातातील सुरीने महिलेवर वार करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करून गंभीर दुखापत केली. हे घटना घडल्यानंतर महिलेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी विकास अभिमान पवार यांच्या विरोधात मंगळवार ३० मे रोजी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहे.