जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२३
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी त्यासह खुनाच्या घटना नेहमीच चर्चेचा विषय बनला असतांना आता नाशिक शहर देखील गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत असल्याचे काही दिवसापासून होत असलेल्या घटनेमुळे नेहमीच जाणवत आहे. दिंडोरी रोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठ जवळील रस्त्याच्या लगत गोणीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या घटनेचा तपस करत आहेत.
नाशिकच्या म्हसरुळ पोलीस ठाण्यात हद्दीत घटना समोर आली आहे. आज सकाळी नाशिक दिंडोरी रोडवर गोणीत एका महिलेचा मृतदेह पडलेला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांना हा मृतदेह दिसून आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून मृतदेहाचा पंचनामा करत तपास सुरु केला आहे.
रस्त्याच्या कडेला संशयितरित्या मूर्तदेह आढळून आल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. घटनेचा तपस करत असून सदर महिलेची हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.