जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२५
पारोळा तालुक्यातील बोळे येथील २० वर्षीय तरुणाचा परिसरात असलेल्या निमदाळे धरणाच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना ५ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कि, बोळे येथे असलेल्या निमदाळे धरणाजवळ बोळे येथीलच सोनल रवींद्र पाटील (वय २०) हा तरुण गेला होता. पाय घसरल्याने सोनल पाटील हा खोल पाण्यात पडला. यावेळी उपस्थित सहकारी व ग्रामस्थांनी धाव घेत धरणातून त्या तरुणाला बाहेर काढले. तर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सोनालला पारोळा येथील कुटीर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी भाऊसाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.कॉ. चंद्रशेखर सोनवणे करत आहेत.
