जळगाव मिरर | १६ मार्च २०२५
जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद होऊन तुला जिवंत सोडणार नसल्याची धमकी देत सागर ज्ञानेश्वर खैरनार (वय २६, रा. समतानगर) यांच्यावर चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १२ मार्च रोजी रात्री ११ वाजता समतानगरात घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगरात सागर खैरनार हा तरुण वास्तव्यास आहे. यापुर्वी त्याचे समतानगरातीलच तीन जणांमध्ये यापूर्वी भांडण झाले होते. त्यातून पुन्हा वाद होऊन तरुणाला मारहाण करण्यात आली. तसेच तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत उजव्या बरगड्यावर चाकूने वार करण्यात आले. यात तरुण जखमी झाला. या प्रकरणी खैरनार यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अजित पाटील करीत आहेत.




















