
जळगाव मिरर / ३० डिसेंबर २०२२
जळगावहून पाचोरा दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत खेडगाव (नंदीचे) गावानजीक मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील सारोळा खु” येथील रहिवासी विलास गवरचंद वाघ (वय – ३२) हा आज ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोटरसायकल क्रं. एम. एच. १९ ए. आर. ६४०३ वरुन जळगांवकडून पाचोऱ्याकडे येत असतांना त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत विलास वाघ हे गंभीर जखमी झाले. दरम्यान विलास वाघ यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत विलास वाघ यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मयत विलास वाघ हे मोल मजुरी करुन आपल्या परिवाराचा गाडा ओढत होते.




















