
जळगाव मिरर | २८ मे २०२५
शहरातील मेहरुण-भिलाटी परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत असलेल्या एका तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. परिसरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने तो कट्टा बाळगत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव विशाल संजय पवार (वय अंदाजे २५, रा. भिलाटी, मेहरुण) असे आहे.
सविस्तर वृत्त असे कि, स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवारी, २७ मे रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, विशाल पवार हा मेहरुण-भिलाटी परिसरातील पाण्याच्या हौदाजवळ गावठी कट्ट्यासह थांबलेला आहे. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने तातडीने कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान विशालकडून ३० हजार रुपये किमतीचे लोखंडी गावठी पिस्तूल आणि मॅग्झिन हस्तगत करण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफौ. विजयसिंग पाटील, रवि नरवाडे, संजय हिवरकर, अतुल वंजारी, राजेश मेढे, पोहेका हरिलाल पाटील, विजय दामोदर पाटील, अक्रम शेख, प्रविण भालेराव, किशोर पाटील आणि प्रदीप चवरे यांचा मोलाचा सहभाग होता.