जळगाव मिरर | २१ जानेवारी २०२६
अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील एका २४ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० रोजी दुपारी ३.३० वाजता उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंतुर्ली येथील प्रशांत भाईदास पाटील (वय २४) हा पुणे येथे कंपनीत नोकरीस होता. आठवड्या भरापासून तो गावी आलेला होता. २० रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजेदरम्यान गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. तर आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. दरम्यान, त्याने मोबाईलवर ठेवलेल्या स्टेटसच्या आधारावर त्याच्या मित्रांना व शेजाऱ्यांना घटनेचा उलगडा झाला. घराचा दरवाजा तोडून पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे आढळले.
ग्रामस्थांच्या मदतीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखर केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रशांतचे आई, वडील काही कामासाठी बाहेरगावी गेल्याने तो घरी एकटाच होता. दरम्यान, प्रशांतने प्रिंटिंग डिप्लोमाचे शिक्षण घेतलेले होते. त्याचा मोठा भाऊ मुंबई येथे कंपनीत कामाला आहे. तर प्रशांतचे वडील शेती करतात.




















