जळगाव मिरर | २८ मार्च २०२५
धुळे तालुका पोलिस स्टेशनच्या खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आणि १९ वर्षांपासून फरार असलेला गोपाळ रावण वाघ (रा.धुळे) या बंदीवान कैदीला स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या जाळ्यात सापडला. पुण्यात लपून राहत असलेल्या या आरोपीला गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली. त्याला २००६ मध्ये घडलेल्या खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षेच्या दरम्यान तो २००८ मध्ये फरार झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुका पोलीस स्टेशनचे खुनाचे गुन्ह्यातील शिक्षा बंदी कैदी गोकुळ रावण वाघ, रा.शासकिय दुध डेअरी मागे, धुळे याने पोहरे ता.चाळीसगाव येथील त्याचे नातेवाईकांला जामीनदार म्हणुन नमुद करून सन २००६ मध्ये शिक्षा भोगत असताना रजेवर गावी आला होता. त्यानंतर तो पुन्हा रजा संपल्यानंतर शिक्षा भोगण्याकरीता कारागृहात हजर झालेला नव्हता. त्यावरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर बरेच दिवसापासून शिक्षा बंदी कैदी गोकुळ रावण वाघ याचा वेळोवेळी शोध घेत असतांना देखील तो मिळून येत नव्हता.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, दिपक चौधरी यांच्या पथकाने केली.




















