जळगाव मिरर | २३ जुलै २०२५
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथील अभिलेख शाखेतील सहाय्यक महसूल अधिकारी आणि एक खाजगी इसम यांनी मिळून एका तक्रारदाराकडून २ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहात पकडले गेले आहेत.
तक्रारदाराने आपल्या गावातील अतिक्रमण प्रकरणातील कागदपत्रांच्या प्रती मिळवण्यासाठी 16 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. त्यानंतर तो वेळोवेळी कार्यालयात जाऊन संबंधित अधिकारी आणि खाजगी व्यक्तींच्या संपर्कात होता. या दरम्यान आरोपी क्र. 2 संजय प्रभाकर दलाल (वय 58) यांनी “शासकीय फी व झेरॉक्स 1400/- रुपये व आमचे 600/- रुपये” असे सांगून एकूण 2000/- रुपयांची लाच मागितली. आरोपी क्र. 1 प्रशांत सुभाष ठाकूर (वय 49), सहाय्यक महसूल अधिकारी, यांनी लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले.
तक्रारदाराने तक्रार दाखल केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली आणि 23 जुलै 2025 रोजी सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले. तपासात 880/- रुपये शासकीय शुल्क आणि 1120/- रुपये लाच रक्कम असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यांनी केली कारवाई
पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकूर, सापळा व पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, सापळा पथक सहापोउपनिरी सुरेश पाटील चालक पोना/ बाळू मराठे, पो.कॉ अमोल सुर्यवंशी
