जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२३
राज्यातील महामार्गावर सुरु असलेल्या अपघाताच्या मालिकेत अनेक परिवारातील सदस्यांचा मृत्यू होत असतांना एक दुर्देवी घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात भरधाव ट्रकने बाईकला धडक दिली. या अपघातात पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोला जिल्हातल्या पातूर तालुक्यातील शिर्ला येथे भरधाव मिनी ट्रक ने बाईक ला जबर धडक दिल्याने पती – पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. अकोला ते नांदेड महामार्गावरुन हे दोघेही शेतातून आपल्या घराकडे जात होते. यावेळी शिरला फाट्या जवळ त्यांच्या बाईकला भरधाव मिनी बसने जोरदार धडक दिली.
या धडकेत पुंडलिक निमकंडे आणि रत्ना निमकंडे या शेतकरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर मिनी ट्रक चालक वाहन घेऊन पसार झाला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.