जळगाव मिरर । १२ नोव्हेबर २०२२
कानळदा रस्त्यावरील उत्कर्ष हॉटेलजवळ समोरुन येणार्या दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्रशांत कोळी यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीवरील चालक हा गंभीर जखमी झाला.
या अपघातात नूतन मराठा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत भिकनराव कोळी (वय-42, रा. उत्तम नगर,कोल्हे हिल्स) यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. तसेच धडकेत दुसरा दुचाकीस्वार गंभीर असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील उत्तम पार्क येथे प्रशांत कोळी हे वास्तव्यास असून ते शहरातील नुतन मराठा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आहे. गुरूवारी ते दुचाकीने जळगाव तालुक्यातील मूळ गावी नांद्रा येथे शेतात दुचाकीने गेले होते.