जळगाव मिरर | २६ एप्रिल २०२४
यावल तालुक्यातील सावखेडासिम येथे जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखा व यावल पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. गावालगत नाल्यात एक जण गावठी हातभट्टीची दारू गाळण करताना आढळून आला असून त्याच्याकडून ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावखेडासिम गावातयिा नाल्याकाठी युसूफ तडवी हा गावठी हातभट्टीची दारू गाळणी करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार प्रमोद लाडवंजारी व यावल पोलिसांनी संयुक्तरित्या तेथे कारवाई केली. तेथून गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन व विविध साहित्य आणि गावठी दारू असा एकूण ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी हवालदार प्रमोद लाडवंजारी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात युसूफ तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस अधीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात हवालदार राजेंद्र पवार करत आहेत.