जळगाव मिरर | ११ मार्च २०२५
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मेहरूण येथील विचार वारसा फाउंडेशनतर्फे युवक-युवतींसाठी धुलीवंदनाच्या सणानिमित्त महिला सन्मान संदेश देण्यात येणार आहें. शुक्रवारी दि. १४ रोजी विचार वारसा फाउंडेशन चौक, मोठी पाण्याची टाकी, रामेश्वर कॉलनी येथे हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
तसेच यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तरी ,मेहरूण परिसरातील नागरिकांनीउपस्थिती द्यावी, असे आवाहन विचार वारसा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी केले आहे