जळगाव मिरर | २० जून २०२३
देशात गेल्या काही महिन्याआधी बहुचर्चित सिनेमा आरआरआर फेम अभिनेता राम चरणच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालंय. राम चरण आणि पत्नी उपासना आई बाबा झाले. 20 जून रोजी उपासनने मुलीला जन्म दिला. दोघांच्या घरी लक्ष्मी आल्यानं दोघेही खुश आहे. लग्नाच्या 11 वर्षांनी राम चरण आणि उपासना आई-वडील झालेत. तर दुसरीकडे अभिनेते चिरंजीवी देखील आजोबा झाल्याच्या आनंदात आहेत.
बॉलिवूड, हॉलिवूड तसेच चाहत्यांकडून राम चरण आणि उपासना यांच्या शुभेच्छांचा आणि चिमुकलीवर प्रेम आणि आशिर्वादाचा वर्षाव होतोय. राम चरण आणि उपासना यांना मुलगी झाल्याचं रुग्णालयाकडून अधिकृत घोषित करण्यात आलं आहे. उपासनाची डिलिव्हरी हैद्राबाद येथील अपोलो हिल्स रुग्णालयात झाली. अपोलो रुग्णालयाने प्रसिद्धीपत्रक जारी करत म्हटलंय, “उपासना कामिनेनी कोनिडेला आणि राम चरण कोनिडेला 20 जून 2023 रोजी हैद्राबादच्या अपोलो हिल्स रुग्णालयात मुलगी झाली. डिलिव्हरीनंतर उपासना आणि बाळ या दोघांची प्रकृती उत्तम आहे.
राम चरणने काही दिवसांआधीच सोशल मीडियावर पोस्ट लिहित उपासना प्रेग्नंट असून आम्ही आई बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय होणाऱ्या बाळाची वाट पाहत होते. आज अखेर दोघांना कन्यारत्न प्राप्त झालं.
उपासना आणि राम चरण यांच्या लग्नाची 11वर्ष त्यांनी नुकतीच साजरी केली. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस त्यांनी जल्लोषात साजरा केला. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, राम चरण आणि उपासना रुग्णालयातून लेकीला घेऊन आता चिरंजीवीच्या घरी शिफ्ट होणार आहे. आपल्या बाळाला आजी- आजोबांचं प्रेम मिळावं असं दोघांना वाटतं म्हणून त्यांनी निर्णय घेतला आहे.
एका मुलाखतीत राम चरणची पत्नी उपासनाला लग्नाच्या 11 वर्षांनी आई होण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा उपासना म्हणाली, “मी खूप खुश आहे. आमच्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला जेव्हा आई व्हावसं वाटलं तेव्हा मी आई होण्याचा निर्णय घेतला या गोष्टीवर मी खूप खुश आहे. समाजाला वाटत म्हणून मी आई होण्याचा निर्णय घेतला नाही. आताची वेळ माझ्यासाठी आणि रामसाठी सगळ्यात चांगली वेळ आणि आम्ही दोघेही अत्यंत खुश आहोत. आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत. आपल्या बाळाची देखभाल करण्यासाठी सक्षम आहोत”.
