जळगाव मिरर | २५ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत यांनी विजय मिळविल्यानंतर एक मोठा निर्णय त्यांनी घेतला आहे. 2024 लोकसभेची निवडणूक लढवत कंगना यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. नुकतीच त्यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली असून खासदार झाल्यानंतर मोठी घोषणा केली आहे. कंगना यांनी बहुप्रतीक्षीत ‘इमर्जन्सी’ सिनेमाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे.
‘इमर्जन्सी’ सिनेमा आता लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सांगायचं झालं तर, सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती खुद्द कंगना यांनी केली आहे. कंगना रनौत यांनी सोशल मीडियावर ‘इमर्जन्सी’ सिनेमाबद्दल मोठी अपडेट शेअर केली आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
‘इमर्जन्सी’ सिनेमा पोस्टर शेअर करत कंगना यांनी कॅप्शनमध्ये, ‘देशाच्या स्वातंत्र्याच्या पहिल्या 50 वर्षांची कथा… जो भारताचा सर्वात काळा काळा होता. ‘इमर्जन्सी’ सिनेमा 6 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त भागाची स्फोटक कथा जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे… चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. ‘इमर्जन्सी’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा अनेक दिवसांपासून थिएटरमध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. दोनदा सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता अखेर 6 सप्टेंबर 2024 रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.