
जळगाव मिरर / १ नोव्हेंबर २०२२
शहरातील निमखेडी शिवारातील पवार पार्क परिसरात विविध नागरी समस्ये बाबत महापौर जयश्रीताई महाजन यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती जळगाव आर.के.ग्रुपतर्फे निवेदन देण्यात आले.
या परिसरातील कचरा फॅट्री पासून होणाऱ्या धुरीच्या त्रास संदर्भात भेट घेऊन निवेदन देण्यात आले असून लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात नाही आला तर आम्ही परिसरातील नागरिक मिळून लवकरच रस्ता रोखो आंदोलन करू असे इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी अखिल भरती भ्रष्टाचार निर्मुलन संघटनेचे महानगर अध्यक्ष निलेश बाविस्कर,संघटक योगेश पाटील, गोपाल महाले, समाजसेवक राज कोळी, वसंत गाडे, सौरभ पाटील,संदीप बडगुजर , अंकित शर्मा ,विवेक पवार उपस्थित होते.




















