जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२३ | गेल्या चार ते पाच दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते आ.एकनाथ खडसे मोठ्या अडचणीत आले आहे. अवैध गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी १३७ कोटी दंडाची नोटीस मिळाली असून अगदी शेवटच्या क्षणी खडसे परिवाराचे नाव टाकण्यात आले आहे ही माहिती मी माहिती अधिकारात काढली आहे. ही नोटीस राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराला दिली गेली पाहिजे होती परंतू तसे नव्हता गिरीश महाजन यांना खडसे परिवाराची अॅलर्जी असल्यामुळे आम्हाला नोटीस बजावली गेली असल्याचे आ. एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
राष्टीय महामार्गाच्या कामासाठी त्या काळात गौणखनिज उत्खनन करण्यासाठी आमची जमीन दिली गेली होती महामार्गाच्या संबधित ठेकेदाराने गौणखनिज उत्खनासाठी शासनाकडून परमीट काढले होते परंतू संबंधित ठेकेदाराने परमीट पेक्षा जास्त उत्खनन केले असल्याचे लक्षात आल्यानंतर २०१७ च्या शासननिर्णयानुसार पाच पट दंडाची नोटीस काम बंद न करता संबधित ठेकेदाराला दिली गेली पाहिजे होती परंतू तसे झाले नाही. एसआयटीने या प्रकरणाची चौकशी केली असून माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असून शेवटी असे म्हटले आहे की, यात दोषी कुणाला धरावे असे म्हटले असल्याने अगदी शेवटच्या क्षणी खडसे परिवाराचे नावे टाकली गेली असल्याचे आ. एकनाथ खडसे यांचे म्हणणे आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी युतीच्या काळात भुसावळ ऐवजी जामनेर मतदारसंघ प्रमोदजींना सांगून भाजपाला सोडला त्या काळात पक्षाने व मी आर्थिक मदत महाजन यांना केली. महाजन हे सामान्य शिक्षकाचा मुलगा होता त्या काळात त्यांच्याकडे सायकल, मोटारसायकल नव्हती मग आता शेकडो कोटीची मालमत्ता कुठून आली याची शासनाने चौकशी केली पाहिजे. मी राजकारणात कतृत्वाने मोठा झालो आहे त्यांच्यासारखा उपकारने मोठा झालो नाही असा टोला लगावत खडसे यांना संपविले तर आपल्याला रान मोकळे होईल या भावनेतून ते माझ्या विरुध्द काम करीत असल्याचा आरोप आ एकनाथ खडसे यांनी केला