• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव महापालिकेच्या रणधुमाळीत युतीचा ट्विस्ट; नाराजांची नव्या आघाडीची तयारी, भाजपची डोकेदुखी वाढणार?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 26, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगाव महापालिकेच्या रणधुमाळीत युतीचा ट्विस्ट; नाराजांची नव्या आघाडीची तयारी, भाजपची डोकेदुखी वाढणार?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर |  संदीप महाले

जळगाव – महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना युतीची घोषणा होताच जळगावच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे. युतीमुळे सत्ता समीकरणे जरी मजबूत होत असल्याचे चित्र दिसत असले, तरी प्रत्यक्षात भाजपमधीलच अनेक इच्छुक उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली असून नाराजीचा स्फोट होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. तिकीटाच्या अपेक्षेने वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे अनेक कार्यकर्ते आता डावलले जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप–शिवसेना युतीनंतर तिकीट वाटपाचे गणित पूर्णपणे बदलले असून अनेक प्रभागांतील इच्छुकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. यामुळे नाराज उमेदवारांनी पर्यायी राजकीय वाटा शोधण्यास सुरुवात केली आहे. काहीजण अन्य पक्षांशी संपर्क साधत आहेत, तर काहीजण स्वतंत्र किंवा नव्या आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची चाचपणी करत आहेत.

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर अन्य पक्षांतील नेते व इच्छुकांना पक्षात प्रवेश दिला होता. त्या वेळी जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली होती. आता त्याच धर्तीवर जळगावमध्येही निवडणुकीच्या काही महिन्यांआधी विरोधी पक्षांतील अनेकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यातच आता शिवसेनेसोबतची युती झाल्याने भाजपच्या एका गटात नाराजी आणखी तीव्र झाल्याचे चित्र आहे. नाशिकप्रमाणेच जळगावमध्येही ही नाराजी उघडपणे व्यक्त केली जात नसली, तरी अंतर्गत बैठका, खलबते आणि राजकीय हालचाली वेग घेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

युतीमुळे तिकीट वाटपाचे समीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. अनेक प्रभागांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे इच्छुक एकमेकांसमोर उभे ठाकले असून, मर्यादित जागांमुळे कोणाला संधी मिळणार आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार, याबाबत अनिश्चितता वाढली आहे. पक्षासाठी दीर्घकाळ झटणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांऐवजी नव्या पक्षप्रवेश केलेल्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याची चर्चा असल्याने असंतोष खदखदत आहे.

नाराज इच्छुक उमेदवार आता गप्प बसण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे दिसते. काही जण नव्या आघाडीची रणनीती आखत असून, काहींनी थेट बंडखोरीची भाषा सुरू केल्याचीही चर्चा आहे. हे चित्र कायम राहिले, तर भाजप–शिवसेना युतीला अपेक्षित फायदा होईल की मतविभाजनामुळे नुकसान होईल, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जळगाव महापालिकेची निवडणूक स्थानिक राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सत्ता मिळवण्यासाठी करण्यात आलेली युतीच जर अंतर्गत नाराजीमुळे अडचणीत आली, तर विजयाचे गणित कोलमडू शकते. नाराज कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अन्य पक्षांत गेले किंवा स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहिले, तर मतांची विभागणी होऊन युतीच्या विजयावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना नेतृत्वासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे ही नाराजी वेळेत शांत करणे. तिकीट वाटपात पारदर्शकता नसेल आणि कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करण्यात अपयश आले, तर जळगाव महापालिकेची निवडणूक युतीसाठी सोपी न राहता अत्यंत अडचणीची ठरू शकते. त्यामुळे येत्या काळात जळगावच्या राजकारणात मोठे उलथापालथीचे दृश्य पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

Related Posts

दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; तरुणाचा रस्त्यावरच दुर्दैवी मृत्यू
क्राईम

दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; तरुणाचा रस्त्यावरच दुर्दैवी मृत्यू

March 23, 2026
भडगावात ड्रग्सची एंट्री : कारमधून एमडी जप्त; महिला सहित दोघे ताब्यात !
क्राईम

भडगावात ड्रग्सची एंट्री : कारमधून एमडी जप्त; महिला सहित दोघे ताब्यात !

March 23, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जिन्यावरून घसरून पडल्याने जखमी वृद्धाचा मृत्यू !

March 23, 2026
पैशांवरून जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू : जळगावात घडली घटना !
क्राईम

पैशांवरून जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू : जळगावात घडली घटना !

March 23, 2026
कासोदा फाट्यावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत शेतकरी ठार
क्राईम

कासोदा फाट्यावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत शेतकरी ठार

March 23, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
क्राईम

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; तरुणाचा रस्त्यावरच दुर्दैवी मृत्यू

दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; तरुणाचा रस्त्यावरच दुर्दैवी मृत्यू

March 23, 2026
भडगावात ड्रग्सची एंट्री : कारमधून एमडी जप्त; महिला सहित दोघे ताब्यात !

भडगावात ड्रग्सची एंट्री : कारमधून एमडी जप्त; महिला सहित दोघे ताब्यात !

March 23, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

March 23, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जिन्यावरून घसरून पडल्याने जखमी वृद्धाचा मृत्यू !

March 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group