
जळगाव मिरर / ९ जानेवारी २०२३
जळगाव शहरातील एका परिसरातील काही नागरिकांनी नगरसेवकाला परिसरात बोलवून समस्या सांगितल्या होत्या.त्यानंतर नगरसेवकांनी लागलीच कर्मचाऱ्यांना सुचना करीत स्वच्छता करण्यास सांगितले पण कर्मचारी आले अन घाण करून गेले. असाच किस्सा घडला आहे.
घडले असे की, शहरातील प्रभाग क्रं.1 मधील राधारमण अपार्टमेंट जवळ दि.8 रविवार रोजी सकाळी या परिसरातील काही नागरिकांनी नगरसेवक दिलीप पोकळे यांना फोन करून बोलविले त्यानंतर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या सर्व समस्या नगरसेवकांना सांगितल्या व नगरसेवकांनी ते ऐकून घेत लागलीच मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना त्या परिसरात नियमित स्वच्छता करायला हवी असे सूचना दिल्या होत्या. घडले ही तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी मनपाचे कर्मचारी या परिसरात आले देखील स्वच्छता केली पण गटारीतून काढलेली घाण बाहेर काढून ठेवली पण सोमवारी सायंकाळपर्यंत ही घाण उचलायला कुणीही आले नसल्याने परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. उलट या परिसरातील नागरिकच बुचकळ्यात पडले आपण तक्रार केली ती स्वच्छता करण्यासाठी पण झाले उलट स्वच्छतेच्या ठिकाणी अस्वच्छताच पसरली, शेवटी नागरिकांनी डोक्याला हातच मारला.
नगरसेवक पोकळेंचे उपायुक्तांना पत्र
प्रभाग क्रं.1 चे नगरसेवक (सध्या तरी हेच प्रभागात दिसत आहे.) दिलीप पोकळे यांना प्रभागातील नगरसेवक वारंवार फोन करून परिसरातील अस्वच्छतेबाबत तक्रारी करत आहेत. तर यावर नगरसेवक नागरिकांना नेहमी आश्वासन देवून कामे ही करून घेत आहेत. पण काही कर्मचारी नगरसेवकांचे काहीही ऐकत नसल्याने आज दि.9 रोजी त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून मनपाच्या आरोग्य विभागातील उपायुक्तांना पत्रच दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आरोग्य विभागाने प्रभाग क्रं.1 साठी दिलेले मुकादम यांना नगरसेवक तक्रार सांगूनही ते दुर्लक्ष करीत आहेत तर कर्मचारी सुध्दा व्यवस्थित काम करीत नाही. याची तत्काळ बदली करण्यात यावी असेच पत्र नगरसेवक पोकळे यांनी मनपाच्या आरोग्य विभागातील उपायुक्तांना दिले आहे.याबाबतचे पत्र नगरसेवकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.




















