
जळगाव मिरर । १ फेब्रुवारी २०२३।
अमळनेर तालुक्यातील बहादरवाडी व खोकरपाट शिवारातून ९ हजार रुपये किमतीच्या विद्युत तारा चोरी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, खोकरपाट तसेच तालुक्यातील बहादरवाडी या भागातील विद्युत पुरवठा पाहणी-वेळी सहाय्यक अभियंता विजय माळी यांना २८ जानेवारी रोजी विविध ठिकाणी ९ हजार रुपये किमतीच्या अल्युमिनियमच्या विद्युत तारा दिसून आल्या नाहीत.
अज्ञात व्यक्तीने तारांची चाेरी केल्याचे लक्षात आल्यानंतर अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरुषोत्तम पाटील करत आहेत.




















