अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील नेताजी नवरात्री उत्सव मंडळ आयोजित नवरात्रीत विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेत आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजक शुभम पाटील, रोहित काळे, हर्षल काळे, दीपक जाधव, शंकर जाधव, दादू जाधव, योगेश वाणी, दादू काळे, आणि सर्व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.
सामाजिक कार्यासोबत धार्मिक उपक्रमाचे आयोजन करत अष्टमीला होमहवन पूजेचे आयोजन रुपेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी नरेंद्र जाधव, अतुल कुलकर्णी, छोटू काळे, यांचे सहकार्य लाभले. गरबा उत्सव यशस्वी होण्यासाठी माऊली मित्र मंडळ आणि नेताजी मित्र मंडळ आणि लहान भाजी बाजार परिसरातील नागरिकांचे सहकार्य लाभले. परिसरातील मंडळ आणि रहिवाश्यांच्या सहभागातून यशस्वी रित्या या उपक्रमाचे आयोजन केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.