अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरातील पानखिडकी येथील जय बजरंग मित्र मंडळतर्फे दुर्गामाता दौड प्रभातफेरी २०२३चे आयोजन करण्यात आले आहे. आई ईच्छापुर्ती माता भक्तांना कळविण्यात अत्यानंद होतो की, संपुर्ण महाराष्ट्रात व देशात दरवर्षी आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवात ९ दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत भावपूर्ण, श्रध्दापूर्ण पहाटे पायी दुर्गामाता दौड पू. संभाजी भिडे (गुरुजी) श्री शिवप्रतिष्ठान (हिंदुस्थान) संस्थापक यांच्या प्रेरणेने व नेतृत्वाखाली सुरु आहे.
तरी सर्व भक्तांनी घटस्थापना दि. १५ ऑक्टोबर २०२३ ते दि. २४ ऑक्टोबर २०२३ विजयादशमी (दसरा) पर्यंत दररोज पहाटे ५.०० वाजता आरतीसाठी वेळेवर हजर रहावे. नवरात्र हे राष्ट्रीय नवरात्र म्हणून शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान साजरे करते…! पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज आज कुठेही जिवंत दिसत नाहीत… ते पुन्हा जन्म घ्यावेत आणि अधोगतीला जाणारा हा हिंदु समाज टिकवावा यासाठी आई भगवतीला भल्या पहाटे विनवनी करणारा हा उपक्रम म्हणजे श्री दुर्गामाता दौड होय.
तरी या श्री दुर्गामाता दौड मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.