
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तालुक्यातील एका गावातील तरुणाच्या घरासमोरून दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी मारवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील एक लहरे गावा तील रहिवासी भोलेराज हरिश्चंद्र पाटील (वय २३) यांच्या मालकीची असलेली दुचाकी दिनांक २६ रोजी त्यांनी घरासमोर लावलेली दुचाकी क्र. एम एच १९ डी टी ३६३५ दुचाकी ५० हजार रुपये किमतीची अनोळखी चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणी मारवाड पोलीस स्थानकात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.सचिन निकम हे करीत आहेत.




















