
अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील सुभाष चौक परिसरात एक २० वर्षीय तरुण हातात विना परवाना तलवार घेवून दहशत माजवीत असतांना अमळनेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुभाष चौक परिसरातील पटेल कॉम्प्लेक्सच्या मागील गल्लीत २० वर्षीय तरुण संशयित आरोपी राजेश एकनाथ निकुभ हा दि ७ रोजी या परिसरात विना परवाना धारदार तलवार घेवून दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना समजली असता त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत, त्याच्याकडून एक धारदार तलवार व चाकू मिळून आला त्याच्या विरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफो.रामकृष्ण कुमावत हे करीत आहेत.




















