अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरात मंगलमूर्ती चौक नरडाणा नाका येथे शहर शिवसेना तर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निषेध व आंदोलन करण्यात आला. शिवसेना आमदारांच्या अपात्रता निकाल प्रकरणी नार्वेकरांचा जोडेमार करून निषेध करण्यात आले.
यावेळी नाशिक जिल्हा शिवसेना कारभारी आहेर उपजिल्हाप्रमुख माजी नाना ठाकोर शेतकरी सेना उप जिल्हा प्रमुख देवेंद्र देशमुख शिवसेना समन्वयक विजू मास्टर वि.सभा शेत्र प्रमुख बाळासाहेब पवार शिवसेना उपतालुका अमळनेर विलासराव पवार , चंद्रशेखर भावसार, शहर प्रमुख मोहन भोई, शहर प्रमुख अनंत निकम राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख सचिन पाटील, शिवसेना चे महेंद्र भाऊ कदम शिवसेना महिला आघाडी अधयक्षा मनीषा ताई परब उज्ज्वला ताई कदम शिवसेना तालुका प्रमुख यांनी नार्वेकरांवर चार पक्ष बदलून नार्वेकर हे जनतेला काय न्याय देतील असे सांगितले. सर्व संपूर्ण निकाल हा दबावतंत्र वापरून दिला गेला आहे असेही त्यांनी यावेळी सांगीतले .येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता कोणासोबत आहे हे दिसून येईल व खरा शिवसैनिक व शिवसेना ही फक्त उद्धव साहेबांची आहे असे दिसून येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. शिवसैनिक युवासेनिक उपस्थित होते.