जळगाव मिरर | ४ एप्रिल २०२५
गिरणा पंपींग रोडवरील रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेखाली झोकून देत दीपक सुपडू महाले (वय ४५, रा. जानता राजा शाळेजवळ, कोल्हे हिल्स) यांनी आत्महत्या केली. ही घटना गुरुवार दि. ३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. प्रौढाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वे कोल्हे हिल्स परिसरातील जनता राजा शाळा परिसरात न दिपक महाले हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. गुरूवार दि. ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते घरातून निघून गेले होते. काहीवेळानंतर त्यांन गिरणा पपींग रोड परिसरातील धावत्या रेल्वेसमोर झोकून देत ळे आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली होती. तर पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं आणि विवाहित मुलगी असा परिवार ने आहे. यावेळी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.