
जळगाव मिरर ८ नोव्हेंबर २०२२
शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले क्षितिज फाउंडेशन नेहमी सामाजिक कामासाठी स्तुत्य उपक्रम राबवित असते, याच प्रमाणे आज दि ८ रोजी शीख धर्माचे पहिले गुरु संस्थापक गुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्त शहरातील सद्गुरु कॉलनीत गुरुनानकदेव जयंतीनिमित्त अभिवादनाच कार्यक्रम घेण्यात आला.
शीख धर्माचे पहिले गुरु संस्थापक गुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्त क्षितिज फाउंडेशनतर्फे तांबापुर मधील सद्गुरु कॉलनीत गुरुनानक यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, बरकतसिंग बाबाजी, गुरुद्वारा अध्यक्ष गुरुचरणसिंग, क्षितिज फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी,भाजपा मंडळचे अध्यक्ष विनोद मराठे, रि.पा.ई.युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे, भाजपा आघाडी अध्यक्ष दिपक बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र नाथ, अक्षय मेघे, हरजीतसिंग खालसा, मानसिंग खालसा, रामसिंग खालसा, जसमतसिंग खालसा, दिलीपसिंग खालसा, सतनामसिंग खालसा, आकाशसिंग खालसा, बागसिंग खालसा यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी गुरु गुरुनानकजी यांच्या कार्याची माहिती दिली.





















