
जळगाव मिरर । १६ नोव्हेबर २०२२
पारोळा तालुक्यातील एक व्यक्ती बँकेतून येत असतांना त्याची रस्त्यावर दोन अनोळखी इसमांनी तब्बल १ लाख रुपयाची फसवणूक केल्याची घटना घडली असून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील कन्हेरे येथील ५२ वर्षीय शेतकरी सुरेश पंडित पाटील हे दि १४ रोजी दुपारी रामनगर तांडा येथिल रस्त्यावरून घरी जात असतांना त्यांच्या मागून दोन अनोळखी दुचाकीस्वार येत त्यांना सांगितले कि आम्ही अधिकारी आहोत. आम्ही चेक करणार अशी बतावणी करीत पिशवीत असलेले १ लाख रुपये काढून घेत हे पैशे कशाचे आहे असे त्यांनी विचारले असता, पाटील यांनी सांगतिले कि, मी बँकेतून येत आहे. असे सांगितल्यावर देखील त्यांनी सांगितले कि आम्ही चेक करून सांगतो त्यानंतर ते तत्काळ घटनास्थळाहून एरंडोलकडे भरधाव वेगात निघून गेले. या प्रकरणी सुरेश पाटील यांनी पारोळा पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउनी राजू जाधव हे करीत आहे.




















