
जळगाव मिरर । १७ नोव्हेबर २०२२
जळगाव तालुक्यातील एका गावात ६० वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात ६० वर्षीय वृद्धाने डोळ्यात औषध टाकून दे म्हणून बोलवत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी हेमराज चौधरी(वय ६०) याच्या विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा नशिराबाद पोलिसात दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोमनाथ वाघचौरे हे करीत आहेत.




















