
जळगाव मिरर । १८ डिसेंबर २०२२ ।
शहरातील न्यु प्लॉट परिसरातून 50 वर्षीय वृध्दाची दुचाकी लंपास झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील न्यु प्लॉट परिसरातील रहिवासी गुलाब कोटुमल फतवाणी(वय 50) यांची दुचाकी क्र.एम.एच.19.बी.एफ.2952 ही दि.16 रोजी अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुलाब फतवाणी यांनी अमळनेर पोलिसात धाव घेत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सफो.बापु साळुंखे हे करीत आहेत.




















