जळगाव मिरर | १३ नोव्हेबर २०२३
देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असतांना जळगाव जिल्ह्यातील एका गावात मात्र एक दुर्देवी घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा येथे दि.११ नोव्हेबर रोजी घरी एकटी असल्याने घरात पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटर लावली. मोटार सुरु असताना पिन काढत असताना विजेचा धक्का लागल्याने राधिका पुरुषोत्तम कहाते (वय ९) या बालिकेचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा येथील पुरुषोत्तम कहाते कुटुंबीयांसह मोलमजुरी करतात. दरम्यान ११ नोव्हेम्बरला दुपारी बाराच्या सुमारास हि घटना घडली. आई, वडील, भाऊ आणि मोठी बहीण मजुरीसाठी शेतात गेल्याने राधिका एकटी घरी होती. नळांना पाणी आल्याने ते भरण्यासाठी राधिका मोटर सुरू करून पिन लावण्यासाठी मोटरीजवळ गेली. मात्र पिन सुटून तिच्या अंगावर पडली आणि विजेचा धक्का लागून ती जागेवरच कोसळली. शेजारी राहणारे भागवत पडोळकर यांनी तिच्या अंगावरील पिन काढली. मात्र राधिका मृत झाली होती.
घटनेची माहिती तिच्या कुटुंबियांना देण्यात आली. यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटना घडली यावेळी राधिकाबरोबर तिच्या मैत्रीणी देखील होत्या. त्या घरासमोरील वाड्यात खेळत होत्या. मात्र नळाला पाणी आल्याने राधिकाने सर्वांना वाड्याच्या बाहेर काढून मोटर सुरू करून पाणी भरले. नळाचे पाणी गेल्यावर तिने वीज प्रवाहातच पिन ओढली आणि ती तिच्या हातात आली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.