
जळगाव मिरर / २७ डिसेंबर २०२२
शहरातील एका विद्यार्थिनीनी ऑनलाईन इंगलीश लर्निंग क्लासेसमध्ये नोंदणी करून ५ हजार रुपये दि.१०/०९/२०२२ रोजी अगाऊ भरून दिले होते, मात्र क्लास न आवडल्याने कंपनीच्या नियमानुसार पैसे परत मिळण्यासाठी केलेल्या तक्रारीला सतत अडीच महिने पाठपुरवठा करून सुध्दा काही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आणि कंपनी प्रतिनिधी तर्फे मोबाईल पण ब्लॉक करून टाकल्याने जगताप परिवार हैरान झाला. मग त्यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्रची सदस्या सौ. मनिषा पाटील यांच्याशी संपर्क साधला.
शहरातील संतोष जगताप यांच्या घरी १०/०९/०२२ ला Byjus’s या ऑनलाईन इंग्लिश लर्निंग क्लासेसकडून एक व्यक्ती प्रतिनिधी म्हणून आला त्याने क्लासविषयी माहिती दिली असता जगताप यांची मुलगी जानवी हिचे अॅडमिशन करून घेतले. तसेच ५४०००/ रु. फी मधून ऑनलाइन लिंग द्वारे ५०००/ रु. अॅडव्हान्स पैमेंट करून घेतले जर तुम्हाला १५ दिवसात क्लास नाही आवडला तर तुमचे पैसे परत मिळतील अशे आश्वासन ही त्या व्यक्तीने जगताप यांना दिले.
दरम्यान क्लासमध्ये काही समजत नसल्यामुळे जानवी हिने ८ दिवसात मिळालेली किट कुरियरने केपनी कडे परत केली. तसेच कंपनीला सुध्दा कळविले तसेच अॅडव्हांस दिलेली रक्कम परत मिळण्यासाठी वारंवार तक्रार केली. मात्र कंपनीकडून अडीच महिन्यात कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जगताप हे ग्राहक पंचात महाराष्ट्र जळगांव तालुका अध्यक्ष महेश चावला यांच्याकडे मनिशा पाटील सोबत येऊन वस्तुस्थिति मांडली आणि हक्काचे पैसे परत मिळवण्या साठी लेखी तक्रार दिली.
त्या अनुसंधाने महेश चावला यांनी लगेच कंपनी प्रतिनिधीला वस्तुस्थिती विचारण्यासाठी कॉल केला अस्ताना त्यांनी काही ही प्रतिसाद दिला नाही. थोड्या वेळयाने त्याचा कॉल आल्यावर त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. मण त्यांना सांगितला कि आतचा कार्य फक्त “संवाद आणि समन्वय” असते आणि आम्ही फक्त ग्राहक हितास सेवा कार्य करतो. त्याचे पुढे कायदेशीर कारवाई साठी जिल्हा ग्राहक आयोग आहेच. त्या करिता तुम्ही ग्राहाला त्यांचे कष्टाचे हक्काचे पैसे परत करा. किमान १० मिनटात त्यांनी जगताप यांच्या खात्यात ५०००/ परत केले आणि सांगितला कि ही रक्कम मी माझ्या खिशातून देतो पण तुम्ही कंपनीचा पाठपुरावा करत रहा जेव्हां कंपनी पैसे परत करेल तेव्हां माझे पैसे परत करा. ग्राहक पंचायत तर्फे मी सतत पाठ पुरावा केल्याचे यश मिळाले आणि आता कंपनी तर्फे जगताप परिवाराला त्यांचे हक्काचे पैसे परत मिळाले आणि जगताप परिवाराने सुध्दा त्या प्रतिनिधी चंद्रकांत सोनवणे यांना आपले पैसे केले. म्हणून आज जगताप परिवारा तर्फे ग्राहक पंचायत च्या सौ. मनिषा पाटील आणि अध्यक्ष ग्राहक पं. महा. महेश चावला यंचे आभार मानले




















