• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

धमकी देणाऱ्या जोर्वेकर ला अटक करा, त्याला प्रोत्साहन देणाऱ्या माजी खासदार माजी आमदारांवर गुन्हा दाखल करा

भाजपा महायुती व तालुका वासीयांच्यावतीने चाळीसगाव तहसील येथे निषेध आंदोलन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 24, 2024
in जळगाव ग्रामीण
0
धमकी देणाऱ्या जोर्वेकर ला अटक करा, त्याला प्रोत्साहन देणाऱ्या माजी खासदार माजी आमदारांवर गुन्हा दाखल करा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जून २०२४

चाळीसगाव येथे दि.२१ जून २०२४ रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन समोर स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, कॉंग्रेस, आप आदी महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात महाविकास आघाडीचा नेता व अनेक गुन्हे दाखल असलेला गुन्हेगारी प्रवृत्तीचा किसन जोर्वेकर यानेदेखील प्रक्षोभक असे भाषण केले. त्यात त्याने चाळीसगाव तालुक्याचे सुपुत्र आमदार मंगेश दादा चव्हाण यांना “माझ्या नादी लागशील तर पिस्तुल आणून गोळी घालून टाकेल रस्त्यावर” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे भाजपा महायुती तसेच चाळीसगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या वतीने निषेध म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बारदान मध्ये बनवलेला किसन जोर्वेकर, माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख यांचा चेहरा असलेला पुतळा आमदार मंगेश चव्हाण यांच्या समर्थकांनी जाळून निषेध केला. यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई आठवले गट आदी महायुती चे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, तरुण, युवक विद्यार्थी,महिला व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

किसन जोर्वेकर याने हे वक्तव्य केले त्यावेळी महाविकास आघाडीचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. आमदार मंगेशदादा चव्हाण यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली तेव्हा यातील अनेकांनी टाळ्या वाजविल्या तसेच हसून दाद दिली. घटनेला आता ४८ तास उलटले तरीदेखील या क्षणापर्यंत माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह तेथे उपस्थित एकानेही या वक्तव्याचा निषेध नोंदवला नाही याचा अर्थ त्यांची या वक्तव्याला मूकसंमती होती. लोकसभा निवडणुकीत आलेला पराभव जिव्हारी लागल्याने तसेच आमदार मंगेश चव्हाण यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करणे अशक्य वाटत असल्याने चाळीसगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे माजी खासदार आमदार व पदाधिकारी नैराश्यात गेले आहेत. त्यामुळे सदर धरणे आंदोलन हे पूर्वनियोजित कटाचा भाग असून त्यात मुद्दामहून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हाफ मर्डर, खंडणी, आदी अनेक गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तीला सहभागी केले गेले व त्यांना मुद्दामहून भाषण करण्याची संधी दिली गेली. म्हणून हा कट रचणाऱ्या उन्मेष पाटील, राजीव देशमुख, धरणे आंदोलन आयोजक राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शिवसेना उबाठा गट तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण व इतर आयोजक पदाधिकारी यांच्यावर देखील प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून गुन्हा दाखल करावा अशी तक्रार भाजपा तालुकाध्यक्ष नितीन पाटील यांनी पोलिसांकडे केली.

सुसंस्कृत चाळीसगावचे भवितव्य अंधारात नेण्याचे पाप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत

चाळीसगाव तालुक्याला सुसंस्कृत अशी राजकीय संस्कृती आहे. अनेकदा वैचारिक वाद झाले मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधी ला विरोध म्हणून गोळी मारून ठार करण्याची धमकी दिल्याचा हा निंदाजनक प्रकार प्रथमच घडला आहे. “मला कॅन्सर आहे, डायबेटीस आहे, माझे वय ७३ आहे मी आजच मेलेलो आहे त्यामुळे मी मरेल पण कुन्हाला तरी मारून मरेल” असे विकृत विचार असणारे पदाधिकारी, गुंड खंडणीखोर अश्या नेत्यांना पुढे करून माजी खासदार, माजी आमदार व महाविकास आघाडीवाले कुठला अजेंडा राबवत आहेत ? अश्या विकृती विचारांना टाळ्या वाजवून, हसून दाद देत मूक संमती देऊन चाळीसगावचे भविष्यातील अंधारात नेणार आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार मंगेशदादा चव्हाण यांना निवडणुकीत पराभूत करणे अशक्य वाटत असल्याने विरोधक महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी यांनी मुद्दामहून मतदारांमध्ये भीती व संभ्रम निर्माण करण्यासाठी सुनियोजित पद्धतीने हे आंदोलन व विद्यमान आमदारांना जीवे ठार मारण्याचे वक्तव्य केले गेले आहे. या आंदोलनामुळे व प्रक्षोभक वक्तव्यामुळे दोन गटात, समाजात, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला गेला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे सदर घटनेला ४८ तास उलटून देखील तसेच अगदी पोलीस स्टेशनच्या आवारात एका विद्यमान लोकप्रतिनिधीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन देखील पोलीस प्रशासनाने कुठलीही कायदेशीर कारवाई संबंधितांवर केली नाही. उपविभागीय दंडाधिकारी यांनीदेखील याची दखल घेतली नसल्याने स्थानिक प्रशासन सदर घटनेच्या अनुषंगाने उदासीन तसेच कुणालातरी घाबरून दबावाखाली असल्याचे स्पष्ट होते

Tags: #chalisgaonbjp Mahayuti

Related Posts

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !
जळगाव

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !
जळगाव

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर
जळगाव

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !
जळगाव

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

June 30, 2025
संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !
क्राईम

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

June 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025
नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

नेचर डे निमित्त हिरवळ पेरणारा उपक्रम !

June 30, 2025
…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

…विजयी मेळावा होणार पण पक्षाचे लेबल…राज ठाकरे !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group