जळगाव मिरर | ६ मे २०२४
चोरलेल्या दुचाकीवरुन अजिंठा चौफुली परिसरात फिरणाऱ्या महेश राजेश गायकवाड (२०, रा. रामेश्वर कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत दुचाकीही हस्तगत केली.
सविस्तर वृत्त असे कि, मेहरुण परिसरातील राहुल संजय वाघ यांची दुचाकी (एमएच १९, डीएल १५९४) पांडेडेअरी चौकातील टपाल कार्यालयासमोरून २२ डिसेंबर २०२३ रोजी चोरीला गेली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरलेली ही दुचाकी महेश गायकवाड हा घेवून फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या व गुन्हे शोध पथकातील पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी पोहेकों गणेश शिरसाळे, पोलिस नाईक किशोर पाटील, सचिन पाटील, विनोद आस्कार, साईनाथ मुंढे, चंद्रकांत पाटील यांनी गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्यासह चोरीची दुचाकी हस्तगत करून जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात दिली.
