जळगाव मिरर / २७ फेब्रुवारी २०२३ ।
देशातील भाजप व आणि आप मधील संघर्ष वाढत असतानाचा दिल्लीतील आम आदमी पक्षाचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आल्यानंतर आप नेत्यांनी रविवारी दावा केला की सीबीआय कार्यालयाजवळ निदर्शने करत असताना त्यांना ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनी त्यांना अटक करण्यात आली. मात्र दिल्ली पोलिसांनी हे दावे फेटाळून लावले. पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर आप खासदार संजय सिंह मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
"Give me CBI, will arrest Modi, Adani within 2 hours": Sanjay Singh after detained AAP leaders released
Read @ANI Story | https://t.co/UKSF5MUyHw#SanjaySingh #AAP #ManishSisodia #PMModi #Delhi pic.twitter.com/3sPUaD2DuW
— ANI Digital (@ani_digital) February 27, 2023
अशा परिस्थितीत कोठडीतून सुटल्यानंतर आपचे खासदार संजय सिंह म्हणाले की, “मनीष सिसोदिया यांना अटक करणे हा मोदी सरकारचा भ्याडपणाचा परिचय आहे. मला सीबीआय द्या, २ तासात मोदी आणि अदानींना अटक करतो” “मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि ईडी आणि सीबीआय आपल्यासोबत असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उद्योगपती गौतम अदानी यांना दोन तासांत अटक करू, असा दावा संजय सिंह यांनी केला आहे.
